मुंबई प्रतिनिधी
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन :- राज्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे जाहीर झालेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे. १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीनंतर नव्याने आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याचे ग्रामविकास खात्याने पत्राद्वारे जाहीर केले आहे. मतदानानंतर ३० दिवसाच्या आत सरपंच पद आरक्षण सोडत आणि उपसरपंच यांची निवड करणे मात्र बंधनकारक करण्यात आले आहे.
जाहीर झालेले आरक्षण रद्द झाल्याने सरपंच पदासाठी होणारा घोडे बाजार आटोक्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. जे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर होते त्या पदासाठी मोठी चुरस निर्माण होऊन मोठा घोडेबाजार होत असतो. त्यामुळे आता ती चुरस दिसणार नसून सदस्य पदाला देखील महत्व प्राप्त झाले आहे. निवडून आल्यानंतर आरक्षण जाहीर होणार असल्याने,सरपंच पदाची माळ गळ्यात पडण्यासाठी आता नशिबच ठरवणार आहे.
सरपंच आरक्षण रद्द, निवडणुकीनंतर होणार पुन्हा आरक्षण सोडत
