सात महिला आरोपींना अटक
प्रतिनिधी
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन :- पिंपरी चिंचवड मधील हिजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बंगलोर मुबंई हा हायवे रोड जात असून या महामार्गावरून एस टी बस , लक्झरी बस व इतर प्रवासाची लाखो वाहने दररोज जात असतात. याच महामार्गावरून बसने प्रवास करीत असताना गोधळ करून लुटमार करणारी महिला टोळी गजाआड करण्यात हिंजवडी पोलीसांना यश आले आहे. महिला टोळतील सात महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
सारिका राम बडबुक्की (वय २०), पल्लवी राम बडबुक्की (वय २२), भवानी मंजेनाथ बडबुक्की (वय ३२), दीपा सेनू बडबुक्की (वय २२, सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्यासह अन्य तीन साथीदार महिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्चना मनोहर देवकर (वय -३७ वर्ष, रा- रुमनं .७ वामन मास्तर वाडी नित्यानंदनगर घाटकोपर वेस्ट मुंबई) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी अर्चना देवकर या कराड ते मुंबई असा प्रवास करीत असताना दुपारी तीनच्या सुमारास सुतारवाडी ते राधा चौकदरम्यान आले असता बसमध्ये असलेल्या एकुण ७ महिला हया फिर्यादी अर्चना देवकर प्रवास करीत असलेल्या बस मध्ये चढुन फिर्यादी जवळ जावुन फिर्यादी अर्चना देवकर यांचेशी वाद घालुन धक्कबुक्की करुन फिर्यादीचे जवळील सोने व चांदीचे दागिने असलेली पर्स व रोख रक्कम १०,००० तसेच त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसूत्र असा एकुन १.८३,२०० रुपयाचा ऐवज जबदस्तीने हिसका मारुन घेवुन पळुन गेल्या.
याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशनकडील हायवे मार्शलवरील पोलीस अंमलदार महामार्गावरून गस्त घालीत असताना वरील सात आरोपी महिला बस थांबल्यानंतर त्या महिला उतरून पळुन जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार हायवे मार्शलवरील पोलीस अंमलदार तानाजी टकले,अविनाश सगर यांनी पळून जाणाऱ्या एकूण सात आरोपी महिलांना महिला नागरिक सोबतीला घेवुन ताब्यात घेण्यात आले. तसेच महिला पोलीस आल्यानंतर त्या सात महिला आरोपींना अटक करून त्यांना कोर्टात हजर करून त्यांची पोलीस कस्टडीची रिमांड घेवून त्यांच्याकडे गुन्हयांबाबतचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, अशा प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या महिलांच्या मागावर पिपरी चिचंवड पोलीस बऱ्याच दिवसापासुन होते , पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर महिलांची ही चोरी करणारी टोळी पोलीसांच्या हाती लागली असुन त्यांच्याकडुन आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश , अपर पोलीस आयुक्त मा.रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ , परिमंडळ दोनचे पोलीस उप – आयुक्त आनंद भोईटे , वाकड विभागाचे सहा.पोलीस आयुक्त गणेश बिरादार , यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) अजय जोगदंड , तपास अधिकारी पो.उप.निरी.नंदराज गभाले , पोलीस अंमलदार अविनाश सगर तानाजी टकले , विजय बंजनी महिला पोलीस अंमलदार रेखा थोत्रे , तेजश्री म्हेशाले , भाग्यश्री जमदाडे , पुनम आल्हाट , यांच्या पथकाने केलेली आहे .