अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, पिंपरी चिंचवड भागातील बेरोजगार युवक युवतींना नामांकित औद्योगिक कंपन्यांमधील रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते श्री. विलास विठ्ठल साखरे (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा)
यांच्या पुढाकाराने येत्या १६ डिसेंबर २०२४ रोजी सोमवारी स.९ ते ४, हिंजवडी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेक कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध असतात मात्र एकाच ठिकाणी या सर्व रोजगार संधी उपलब्ध होऊन, कंपन्यांच्या प्रतिनिधींद्वारे मुलाखती आयोजन करण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील विविध नामांकित कंपन्यांमधील रोजगार संधींबाबत या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना माहिती देण्यात येणार असून, तिथेच इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे, तसेच प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांना लगेचच नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे या रोजगार मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नसून सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, बी. ई. मेकॅनिकल इंजिनीअरिंग, बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स, बी. ई. इलेक्ट्रिकल, बी. ए. बीएस्सी अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर किंवा क्यू आर कोडद्वारे नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजक विलास विठ्ठल साखरे यांनी सांगितले.
नावनोंदणी लिंक : https://tinyurl.com/HinjewadiRojgarMelava2024
अधिक माहितीसाठी संपर्क
76 2060 3256 /8788664812