पुण्यातील NYAASS संस्थेच्या हजारो बेघर आणि गरीब मुलांनी राखीचा धागा बनवला आहे आणि तो बनवताना त्यांनी त्याला आपल्या मायेची ऊब दिली आहे, त्यामुळे यंदा थेट त्यांच्याकडूनच राख्या घेऊन आपला रक्षाबंधनाचा सण साजरा करू या.
सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
खरतर रक्षाबंधन हा सणच रक्षण करण्यासाठी साजरा केला जातो,जो आपले रक्षण करतो त्याला येक धागा बांधुन आपल्या भावना व्यक्त करण्याचा सण आहे.
अगदी तसेच पुण्यातील NYAASS ही संस्था तेथील मुलांच्या भविष्याचे संरक्षण करत आहे.
आज त्या संस्थेमध्ये रक्षाबंधनाच्या सणानिमित्त तेथील असणार्या लहान मुलांनी आपल्या हाताने राख्या बनवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या आणि त्या घेऊन जा किंवा तुम्ही
7972418492 किंवा 9307573066 या दिलेल्या नंबर वरुन ऑर्डर देखील करू शकता.
यांच्याकडून राखी का घ्यावी:-
हजारो बेघर आणि गरीब मुलांनी तो धागा बनवताना त्याला आपल्या मायेची ऊब दिली आहे.त्यामध्ये त्यांचे आशीर्वाद आणि भरभरून प्रेम असणार आहे. जो तुम्हाला बाहेर मार्केट मध्ये विकत घेऊन देखिल मिळणार नाही.हा दिसायला जरी धागा असला ना तरी तो धागा बनवताना त्यांच्या भावना, अशा त्यात असणार आहेत.असे समजा की मुलांच्या रुपात देवाने तो धागा देऊन तो धागा त्या मुलांच्या आशिर्वादने आपले रक्षण करेल.
त्यामुळे अगदी कमी किमतींमध्ये म्हणजे 25 रुपये मध्ये ती उपलब्ध आहे, किमतीपेक्षा देखील ती प्रेमाने बनवलेली ही राखी घ्या आणि आपले रक्षाबंधन आनंदाने साजरे करा.
NYAASS संस्था नेमकी काय आहे आणि काय काम करते:-
नित्या युथ असोसिएशन फॉर अवेकनिंग सेल्फ अँड सोसायटी (NYAASS) पुणे, महाराष्ट्र येथे स्थित आहे. विविध प्लॅटफॉर्मवर काम करत ही संस्था मुलांच्या भल्यासाठी काम करते. शिक्षण, अन्न, स्वच्छता आणि आरोग्य या महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेचे सध्या प्रमुख मुद्दे आहेत. विशेष म्हणजे 2019 मध्ये स्थापन झाल्यापासून, एनजीओने हजारो बेघर आणि गरीब मुलांच्या जीवनात सक्रियपणे लाभ घेतला आहे.
महाराष्ट्रातील तरुणांचे सामूहिक प्रयत्न त्यांच्या सक्रिय कार्यामागील प्रेरक शक्ती आहेत. स्थानिक खाजगी शाळांच्या सहकार्याने प्राथमिक शिक्षण प्रदान केल्याने या मुलांचे जीवनमान सुधारण्यासाठी NYAASS ला मदत झाली आहे.
आणि तसेच आपल्या देखील पाठिंब्याने आणि देणग्यांमुळे पुणे स्थित नित्या युथ असोसिएशन फॉर अवेकनिंग सेल्फ अँड सोसायटी (NYAASS) अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकते.त्यामुळे शक्य होत असेल तर एक मदतीचा हाथ तुम्ही देखील द्या.
NYAASS संस्था ही महाराष्ट्रातील पुणे विभागातील तरुणांच्या सहयोगी प्रयत्नांचे परिणाम आहे. नित्या युथ असोसिएशन फॉर अवेकनिंग सेल्फ अँड सोसायटी एनजीओचे संस्थापक वंचित मुलांचे जीवन चांगले बनवण्यासाठी मनापासून समर्पित आहेत. अडथळे आणि आर्थिक कमतरता असूनही, या संस्थेने 2019 पासून आपले मोलाचे कार्य सुरू ठेवले आहे.
सध्या कर्वेनगरमध्ये कार्यरत, NYAASS पुण्याच्या इतर भागांमध्ये पलीकडे पोहोचण्याची आणि मदत करण्याची योजना करत आहे. त्यांच्या मोहिमा प्रेरणादायी आहेत आणि मोहिमा फलदायी आहेत. NYAASS मध्ये स्वयंसेवक बनणे तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेच्या आणि कार्याच्या मार्गावर जाण्यास मदत करेल.
त्यामुळे आपल्या सर्वांचा सहभाग आणि मदत देखील या संस्थेमधील हजारो मुलांना त्यांचे भविष्य घडविण्यास मदत करू शकते.