चला तर मग पुणेकरांनो आणि पुण्यामधे ज्यांना फिरायला यायच आहे त्यांच्यासाठी पाहू ही पुढील ठिकाणे जिथे तुम्ही जाऊन पाऊसातील त्या निसर्गाचा आनंद मनसोक्त लुटू शकता.
सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
उन्हाळ्यामुळे सर्वजण वैतागलेले असतात त्यात आतुरता लागते ती पावसाच्या आगमनाची.कारण पाऊस पडला की म्हणतात ना;
“हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे”
निसर्गात जाऊन सफर करणाऱ्याची मजा काही वेगळीच असते ना.आता अशीच मजा करण्यासाठी, निसर्गा ला जाणुन घेण्यासाठी, तो पाऊस, धबधबे, वाहणारे पाणी, ते गड किल्ले पाहण्याची मजा काही वेगळीच असते.
सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या पुणे शहर आणि परिसराला मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. पावसाळ्यात तर हा परिसर मुक्तहस्ताने निसर्ग सौंदर्याची उधळण करत असतो. त्यामुळे मान्सून मध्ये पुण्याजवळील या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
पुण्यात फिरायला गेले की सर्वात आधी डोळ्यासमोर तो म्हणजे
ताम्हिणी घाट:- सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट द्यायला हवी ती ताम्हिणी घाटाला. पावसाळ्यात इथल्या टेकड्या कात टाकतात. रूक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. इथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची (रिव्हर राफ्टींग) जोडही देता येते.
ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे.
पुण्यापासून पौड रस्त्यापासून ९३ किमी अंतरावर आहे. मुंबईकडून येताना मुंबई – पुणे महामार्गावर लोणावळा इथे बाहेर पडावे लागते. लोणावळ्यापासून ऑबी व्हाली रस्त्याने ताम्हीनिकडे जाता येते.
जर तुम्हाला अभयारण्यात जाण्याची आवड असेल तर येथे नक्की जा,
भीमाशंकर अभयारण्य:- खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे.
अतिशय दुर्मीळ असणाऱ्या शेकरू (Ratufa indica) या प्राण्याच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून त्याला उडणारी खार किंवा भीमखार असेही म्हणतात. या अभयारण्यात वाघ, बिबटे, रानडुक्कर, सोनेरी लांडगा, कोल्हा बरच आहे.तसेच प्राण्यांप्रमाणेच मोर, दयाळ, पोपट, कोतवाल, कोकीळ, तांबट, घुबड, इत्यादी पक्षांचा आढळ या वनात आहे.
पुणे म्हटलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे;
लोणावळा:- हे सर्वांच्या आवडीचे असे प्रेक्षणीय स्थळ आहे.जिथे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरुन देखील लोक येऊन येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात.
जायचे कसे ?
अंतर : पुण्यापासून रेल्वेने हे अंतर 64 किमी व रस्त्यावरून 68 किमी
वेळ:- रेल्वेने 45 मिनिटात पोहोचता येते. बस किंवा गाडीने सव्वा दोन तासात पोहोचणे शक्य होईल.
साधने:- पुण्यातून रेल्वे , बस उपलब्ध. स्वत:ची गाडी नेऊ शकतात. रस्ते तसे एकदम उत्तम आहेत.
काय पाहणार तिथे जाऊन:-
पावसाळ्यात याठिकाणी तीनचार महिने मोठी गर्दी पहिला मिळते, हिरवीगार झाडे, निसर्गशोभा, डोंगरमाथे व दर्या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे यांमुळे येथे पावसाळ्यात जाणे आनंददायी अनुभव ठरतो.
येथील मुख्य आकर्षण – राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वत्र प्रसिद्ध आहे.
पुण्याचे आकर्षण लवासा:-
अंतर : पुण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.
वेळे : दोन ते अडीच तासात पोहोचणे शक्य
साधने : दुचाकी, चारचाकी अथवा कॅबने जाणे सोयीचे
आकर्षण : भारतातील पहिले योजना आखून निर्माण केले गेलेले, डोंगरांच्या मध्यभागी वसवलेले असे हे पर्यटन स्थळ आहे. पावसाळयात कुटुंबासह जाण्यासाठी एक परिपुर्ण ठिकाण म्हणून याचा उल्लेख केला जातो. 25 एकरात वसवलेले हे एक सुंदर छोटेसे शहरच आहे. याठिकाणच्या रस्त्यांवरून पायी फिरणे हा एक सुखद अनुभव असतो. छायाचित्रणासाठीही हे एक लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. हिरव्यागार लँडस्केपसह सात टेकड्यांमधून वसवलेल्या या ठिकाणाला आवश्य भेट द्यायला हवी.
वरंधा घाट:-
अंतर : सुमारे 82 किमी
वेळ : दीड ते दोन तासात पोहोचता येते.
साधने – स्वत:च्या वाहनाने जाणे हा उत्तम पर्याय
आकर्षण : पुण्याहून भोर महाडकडे जाताना वरंधा घाटाचा रस्ता 20-25 किलोमीटर लांबीचा आहे. हा घाट सह्याद्रीच्या लगत उभ्या असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासांची शिवथरघळ आहे. मोठे डोंगर, निसर्ग येथे अनुभवायला मिळतो. पावसाळ्यात येथे असंख्य धबधबे कोसळत असतात. सकाळी पहाटे निघून एका दिवसत हा परिसर फिरता येतो.
पुण्यात आला आणि पानशेत नाही अस होणार नाही:-
अंतर : शहरापासून 40 किमी अंतरावर
वेळ : साधारण 1 तासात पोहोचता येते.
साधने : दुचाकी, चारचाकी ने जाणे लोक पसंत करतात. बसही उपलब्ध
आकर्षण -पुण्याला पाणीपुरवठा ज्या ठिकाणाहून होतो असे पाणशेत धरण आणि बाजूचा परिसर पावसाळ्यात लांबवर हिरवागार दिसतो. आजूबाजूला फुललेली असंख्य रानफुले, डोक्यावर पावसाळी ढग, आजूबाजूला डोंगरावरून कोसळणारे धबधबे शेतामध्ये शेतकर्यांनी केलेली पेरणी असे वातावरण अनुभवायचे असेल तर पुण्याच्या जवळच असणार्या पाणशेत ला आवश्य भेट द्यायला हवी. येथून जवळच तोरणा किल्ला आहे. पानशेत ला स्वत:च्या वाहनाने जाणार असले तरी हा परिसर पायी फिरण्यात खरी मजा आहे. पावसाळ्यात या परिसरात सगळीकडे फुलणार्या पांढर्या फुलांचे ताटवे बघणे, आजूबाजूला कोसळणारे धबधबे, डोंगररांगा या सगळ्यांच्या सोबतीने पावसात चिंब भिजण्याची मजा घेण्यासाठी जवळच असणार्या पानशेतला पर्याय नाही.
पुण्यामध्ये असे अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता.गड किल्ले आहेत परंतु थोडा पाऊस कमी झाला की जावा कारण पाऊस आणि धुक्याने तुम्हाला आपले गड किल्ले व्यवस्थित दिसणार नाहीत. त्यामुळे किल्ल्यांच सौंदर्य हे पाऊस कमी झाला नक्कीच पाहून या.
पावसाळ्यात प्रवास करा पण स्वतः स्वतःची काळजी घेऊन करा.धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळाच…
आजुन काही माहिती हवी असेल किंवा जाहिरात द्यायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
सुजाता मिरगणे:9359163632