सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक, दोन पाच, दहा आणि वीस रुपयांच्या नाण्यांची खास मालिका जारी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही नाणी सामान्य नाण्यांपेक्षा अगदीच विशेष असणार आहे.
कारण या नाण्यांचे वेगळेपण म्हणजे ही नाणी किती रुपयांची आहेत हे अंध व्यक्तींनादेखील ओळखता येणार आहेत.
दिल्ली येथील अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आयकॉनिक विक या साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील खास नाणी सार्वजनिक केली.
तसेच या विशेष नाण्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत ते म्हणजे ,या नाण्यांवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’चा (AKAM) लोगो असेल.