सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
कोरोना महामारीचा काळ सुरु असतानाच जगभरात आता मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे आता त्याबाबत जागरुकता ठेवण्यात आली आहे.
आणि हीच जागरूकता निर्माण करत आणि काळजी घेत बेल्जियम देशाने ;
या आजाराची चार प्रकरणे समोर आल्यानंतर मंकीपॉक्स रुग्णांसाठी २१ दिवसांचे अलग ठेवणे अनिवार्य करणारा बेल्जियम हा पहिला देश ठरला आहे.
याबद्दल बेल्जियमच्या आरोग्य अधिकार्यांनी हा निर्णय घेतला, असे सौदी गॅझेटने बेल्जियम मीडियाचा हवाला देत वृत्त दिले आहे.
त्याचबरोबर बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनने म्हटले आहे की देशात मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याचा धोका कमी आहे.