सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
पुणेकरांनो सुट्टीचा प्लॅन करत आहेत का?
कुठे जायचे हा मोठा प्रश्न?
उन्हाळा आहे मग आता थंड ठिकाणे कोणती?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा आपल्या नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन मध्ये.
खरतर उन्हाळ्याची सुट्टी संपत आली आहे, आता शाळा,महाविद्यालये सुरू होतील,सर्व गृहिणी कामात व्यस्त होतील. आणि महत्वाचे म्हणजे त्यात आता जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होईल. त्यामुळे जास्त बाहेर पडता येणार नाही.
आणि या सर्व कारणांमुळे सर्वांना कुठेनाकुठे बाहेर जाण्याची इच्छा होते.कोणी एक दिवसाचा प्लॅन करतो तर कोणी एक आठवडा. तर आता नेमके कुठे जायचे आणि काही समजत नसेल तर पुणेकरांनो आपल्या आजूबाजूला अशी खूप ठिकाणे आहेत जिथे तुम्ही जाऊन सुट्यांचा मनसोक्त आनंद लुटू शकता आणि उन्हाळ्यापासून थोडी सुटका मिळवू शकता. कारण तुम्ही पुण्यामध्ये असणार्या विविध वॉटरपार्कला जाऊन भेट देऊ शकता.
अगदी तुमच्यापासून जवळ असणारे पुण्यामधील वॉटरपार्क-
1- आपल्या सर्वांना माहित असणारे अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका वॉटरपार्क
अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका हे खरतर देशातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॉटर पार्क आहे.हे साधारणतः मुंबई आणि पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. खालापूर टोल नाक्यापासून इमॅजिका वॉटर पार्क चार किलोमीटर अंतरावर आहे.
याचे वैशिष्ट्य असे आहे की तुम्ही या वॉटर पार्कमध्ये १४ राईडस अनुभवू शकता तसेच इथे लहानांपासून मोठयांपर्यंत असणार्या सर्वच वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकतात.
2- सिंहगड जवळ असणारे कृष्णाई वॉटर पार्क
पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळच्या दोनजी गावाजवळ कृष्णाई वॉटर पार्क आहे. हे जळजळ पंधरा एकरमध्ये पसरले आहे,तुम्ही नक्कीच या वॉटर पार्कमध्ये तुम्ही वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकता. तसेच तुम्ही किल्ल्याचे देखील दर्शन घेऊ शकता.
3-सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क
जर तुम्ही एक दिवसाची सुट्टी प्लान करत असाल तर पुणेकरांसाठी सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
हे साधारणतः मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर रावेतपासून एक किलोमीटर अंतरावर हे वॉटर पार्क आहे. वेगवेगळया वॉटर स्लाईडस, स्विमिंग पूल आणि वेव्ह पूल या ठिकाणी आहेत.विशेष म्हणजे जर पर्यटकांचा इथे प्लॅन असेल तर येथे राहण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे.
4- मनोरंजनाचा धमाका म्हणजेच डायमंड वॉटर पार्क
पुण्याच्या लोहगाव परिसरात डायमंड वॉटर पार्क असून
इथे तुम्ही वेगवेगळया तब्बल २८ राईडसचा आनंद लुटू शकता. वेव्ह पूल, रेन डान्स, फॅमिली पूल, लेझी रिव्हर आणि हनी बनी असे मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या वॉटर पार्कमध्ये मिळतील.विशेष म्हणजे कोणाला पाण्याची भीती वाटत असेल तर किंवा काही नकळत काही घडते त्यासाठी इथे पर्यटकांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य ठेऊन जीवरक्षक पूर्णवेळ तैनात केलेले आहेत.
5- राईडसला पसंती देणार्यांसाठी पानशेत वॉटर पार्क
खरतर येथे तुम्हाला जाणता पुण्यामध्ये प्रसिद्ध असणार्या खडकवासला धरणाचा देखील आनंद घेता येईल,कारण
पानशेत वॉटर पार्क खडकवासला धरणाच्याजवळ आहे. या वॉटरपार्कचे एक खास वैशिष्टय़ आहे ते कारण इथे राईडस कमी आहेत पण सर्वांना आवडणारे स्पीड बोटिंग, वॉटर स्कूटर्स अशा वॉटर स्पोटर्सचा पर्याय आहे. याच गोष्टींमुळे हा वॉटर पार्क वेगळा ठरतो.
त्यामुळे आता जास्त विचार ना करता आणि उन्हाळा संपण्याच्या आधी तुम्ही एकदा तरी नक्की वॉटरपार्कला जाऊन भेट द्या आणि सुट्टीचा आनंद लुटा.