सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-जून महिना जवळ आला की पावसाची चाहूल लागते, त्यातच मग पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये ,तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये याकरिता महापालिकेच्या वतीने आता सोलापूरकरांनसाठी आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये होणारी घरांची पडझड,सुसाट वाहणारा वारा यापासून होणारे नुकसान, तसेच पावसाचे पाणी घरांमध्ये शिरणे,गटारीचे पाणी जागेवर साचणे अशा अनेक समस्या जर उद्भवल्या तर त्यातून नागरिकांना तत्काळ मदत मिळावी म्हणून या कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ७४०३३५ या नंबर वर फोन करून आपली तक्रार नोंद करावी.
खरतर नालेसफाईची कामे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत,साधारणतः ही सर्व कामे २५ मे पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या वर्षीचा पावसाळा खूप जोरात असणार आहे त्यामुळे महापालिकेच्या जिसीबिचा वापर करून ,सर्व कचरा काढून त्या कचर्याचे योग्य ते व्यवस्थापन केले जात आहे.अशा प्रकारे महापालिकेचे काम अगदी जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे महापालिका आयुक्त पी.शिवशंकर हे अधिकारी,कर्मचार्यांना नियुक्त करतील आणि त्यांना किमान ८ तासाची तरी ड्युटी बंधनकारक आहे.आणि या कक्षाचे काम रात्रंदिवस चालू असेल.
या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापना मध्ये कोणाला काही अडचण आली असेल तर ७४०३३५ या नंबर वर फोन करून आपली समस्या सांगितल्यानंतर ती सोडवण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या वतीने केला जाईल.