सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
भारतात आरोग्यसेवा पुरवण्यात आघाडीवर असलेल्या भारतातील १० लाख आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते) म्हणजे आशा दिदी नावाने ओळखल्या जाणार्या आपल्या आशा वर्कर्स यांना सध्या सुरू असलेल्या ७५ व्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड २०२२ ने सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वांसाठी ही अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.
विशेष म्हणजे ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्डच्या सहा प्राप्तकर्त्यांपैकी आशा कामगार एक आहेत.
विशेष म्हणजे WHO कडून सन्मानित झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतातील १० लाख आशा कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या,आणी आपला निरोगी भारत सुनिश्चित करण्यात ते आघाडीवर आहेत आणि त्यांचे समर्पण आणि दृढनिश्चय वाखाणण्याजोगे असल्याचे त्यांनी मान्य केले. १० लाखांहून अधिक महिला स्वयंसेविका ASHA ने लस-प्रतिबंधित रोग, उच्चरक्तदाब आणि क्षयरोगावरील उपचार, सामुदायिक आरोग्य सेवा आणि पोषण, स्वच्छता आणि निरोगी जीवनासाठी आरोग्य संवर्धनाच्या मुख्य क्षेत्रांसाठी मातृत्व काळजी आणि लसीकरण प्रदान करण्यासाठी कार्य केले.
सर्वात महत्त्वचे म्हणजे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका प्रकाशनात म्हटले आहे की, “ASHA (ज्याचा अर्थ हिंदीमध्ये आशा आहे) भारतातील १ दशलक्षाहून अधिक महिला स्वयंसेविका आहेत.
या सर्वांचे समाजामध्ये योगदान खूप मोलाचे आहे कारण ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविल्याबद्दल आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना काळामध्ये त्यांनी आपली मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
कोरोना महामारीच्या काळात आशा कार्यकर्त्यांनी फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम केले. घरोघरी जाऊन कोरोनाबाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्याचे काम त्यांनी केले आहे.
सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे सहा पुरस्कारांची घोषणा-
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालक टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी रविवारी सहा पुरस्कारांची घोषणा केली. जागतिक आरोग्य, प्रादेशिक आरोग्य समस्यांमध्ये नेतृत्व आणि कार्य करण्यासाठी वचनबद्धता दर्शविल्याबद्दल हा मोलाचा पुरस्कार देण्यात आला.
- हा पुरस्कार समारंभ ७५ व्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या उच्च-स्तरीय उद्घाटन समारंभात जोडला गेला. २०१९ मध्ये या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड’ विजेत्यांची निवड महासंचालक टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी केली.
आशा म्हणजे एक नवीन उम्मीद –
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की सन्मानित लोकांमध्ये आशा वर्कर्सचाही समावेश आहे, खरतर आशाचा अर्थ हिंदीमध्ये ‘उम्मीद’ आहे. भारतात दहा लाखांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
अशा या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता,जिद्दीने आणि चिकाटीने आपले काम पूर्ण करणाऱ्या या सर्व आशा वर्कर्स म्हणजे आपल्या आशा दिदींना नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन कडून हार्दीक शुभेच्छा आणि शतशः नमन.