सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:- पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) सेमी हायस्पीड रेल्वे उभारणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे नाशिक ची द्राक्षे,कांदा इत्यादी आता अवघ्या दोन तासांत पुण्याच्या बाजारपेठ मध्ये सर्वाना मिळेल. सेमी हायस्पीड रेल्वेमुळे आता पुणे-नाशिक या २३५ किलोमीटर लांबीच्या पट्याचे अंतर यामुळे कमी होण्यास मदत होईल.
या मार्गात २०स्थानके असतील ती म्हणजे;
पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आंळदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, आंभोरे, संगमनेर, अमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मोहदरी, वडगाव पिंगला नाशिक रस्ता असे असणार आहेत. या प्रत्येक स्थानकाचे वेगळे महत्व आहे.
खरतर पुणे आणि नाशिक ला राज्यातील सर्वांत श्रीमंत असा औद्योगिक आणि कृषी पट्टा म्हणून ओळख आहे,आणि आता या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पासाठी नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे.मुख्य म्हणजे या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यासाठी मदत तर होईलच शिवाय वेळ,इंधनाची बचत तसेच प्रदूषण कमी होण्याबरोबरच कृषी व औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे काही प्रमुख कृषी उत्पादनांना मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होईल;जसे की,
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, मंचर,आळेफाटा या भागातील भाजीपाला, द्रक्षे, कांदा,फळे व फुले देशाच्या विविध भागांत पाठविली जातात.
रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस पन्नास किलोमीटरच्या परिसरात दूध उत्पादन, भाजीपाला, फळे आणि ऊस या प्राथमिक उत्पादक कंपन्यांना फायदेशीर ठरेल.
तसेच मंचर, जुन्नर, संगमनेर, सिन्नर येथे उसावर प्रक्रिया करणारे साखर कारखाने आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
विविध कृषी, दूध प्रक्रिया केंद्र व खाद्य प्रक्रिया उद्योगांना चालना भेटेल आणि नाशिकमधील ऊस, कांदा सुद्धा अन्य भागात पाठविणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चांगला फायदा मिळेल,जसे कि ,
शेतकऱ्यांना शेतीमाल बाजार समितीपर्यंत लवकर पोचविणे शक्य होईल,माल वाहतूक जलद व कमी दरात होणार,नाशवंत मालासाठी पार्सल व्हॅनची सुविधा,पुण्यासह देशातील बाजारपेठेत माल पाठविण्यासाठी हा मार्ग अत्यंत उपयोगी ठरेल, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावर माल पाठविणे शक्य होईल,८० टक्क्यांनी अन्नधान्याच्या वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रकल्प उभारणीच्या काळात जवळपास किमान २५ हजार लोकांच्या हाती रोजगार असेल.