प्रतिनिधी
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन :- राज्य पातळीवरील ‘कृषी पुरस्कार वितरण सोहळा’ राज्यपाल मा. भगत शिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (ऑनलाईन) यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. गेल्या २ वर्षातील कोरोना संकटकाळात सर्वच क्षेत्रात अस्थिरतेचं सावट असताना कृषी क्षेत्राचं नुकसान मर्यादित राहिलं.त्यामुळे सर्वच क्षेत्रांची व्यवस्था कोलमडत असताना कृषीक्षेत्रानं अर्थक्षेत्राला स्थिरता दिली. शेती व श्रमाची प्रतिष्ठा पुन्हा वाढली असून ती भविष्यातही अशीच वाढत राहील. १० टक्के व्याजदरानं सावकारी कर्ज घेण्यापेक्षा ० % टक्के व्याजदरानं कर्ज घेऊन सरकारी योजनांचा लाभ घ्यायला हवा. जे विकेल तेच पिकवायला हवं. पूर्वी दुसऱ्या देशातून शेतीमालाची आयात आपण करत होतो. आज आपण स्वयंपूर्ण आहोत. आपल्या शेतीमालाला आता परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी होतेय. कमी वेळेत कमी पाण्यावर रोगाला बळी न पडणारे वाण आता आपण विकसित करायला हवे. त्यासाठी राज्यातील ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांना ५० कोटी रु. संशोधनासाठी शासनामार्फत दिले जाणार आहेत. शेती शाश्वत होण्यासाठी पुरक व्यवसाय करा. आपण उत्पादित करत असलेले धान्य हे रसायनमुक्त असायला हवे, त्यासाठी लक्ष द्यावं लागेल. सेंद्रिय औषधांच्या निर्मितीसाठी संशोधन व त्याचा वापरही आपल्याला वाढवावा लागेल. ऊसाची शेती किफायतशीर होण्यासाठी शेतातील ऊस संपेपर्यंत कारखाने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कारखान्यांना त्यासाठी किलोमीटरप्रमाणे सबसिडी दिली जाणार आहे. तसंच मदत म्हणून २०० टनापर्यंत रिकव्हरी लॉसची योजना आणली आहे. येत्या काळात साखर कारखाने चालवायचे असतील तर इथेनॉल निर्मिती शिवाय पर्याय नाही. कोळशाच्या संकटामुळे भारनियमन टाळण्यासाठी सोलर उर्जेचा अंगिकार आपण करायला हवा. पुण्यात लवकरच अत्याधुनिक सेवा-सुविधायुक्त कृषी भवनच्या जुन्या इमारतीची नवनिर्मिती केली जाणार असून त्यामार्फत शेती, मातीची दैनंदिन अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शेतकरी जगला तर राज्य जगेल;तो मोडला सर्वच मोडेल म्हणून शेतकऱ्यांसाठी शासन मागे होणार नाही. तीन वर्षांच्या पुरस्कारासाठी ५१ लाखांची तरतूद करावी लागली परंतु यापुढे या पुरस्कारासाठी पाच पट वाढीव तरतूद केली जाईल. तसंच मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेतून शेतीच्या मुल्यवर्धनावरही भर दिला जाईल. शेतीच्या बाजारपेठेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं बळकटीकरण करण्यावर शासनाचा भर आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना थेट बांधावर उपलब्ध करून देणार.
हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना थेट बांधावर -उपमुख्यमंत्री अजित पवार
