पिंपरी
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेला जिल्हयात उत्कृष्ट काम करणारी पगारदार सहकारी पतसंस्था म्हणून या वर्षीची प्रथम क्रमांकाची मानाची ढाल पीडीसीसी बॅंकेचे चेअरमन रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुण्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी (दि. 25 ऑक्टोबर) झालेल्या कार्यक्रमात थोरात यांच्या हस्ते संस्थेचे मार्गदर्शक (तज्ञ संचालक) अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुडे यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक मदनराव देवकाते व सुरेश अण्णा घुले यांच्या हस्ते व बँकेचे अधिकारीव मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक विजयराव टापरे, उपसरव्यवस्थापक सुधीर पाटोळे, सहा. सरव्यवस्थापक अभिजीत हेगडे व कर्ज अधिक्षक बिगरशेती विभाग अंकूश हिंगे आणि पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढगे, खजिनदार महादेव बोत्रे आणि संचालक महाद्रंग वाघेरे, मनोज माछरे, संजय कुटे, दिलीप गुंजाळ, नथा मातेरे, संचालिका चारुशिला जोशी, माजी संचालक आबा गोरे आदी उपस्थित होते.
आतापर्यंत दोन वेळा हा पुरस्कार मिळविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेला जिल्हयातील उत्कृष्ट काम करणारी पगारदार सहकारी पतसंस्था म्हणून एकमेव संस्था आहे. यापुर्वीही सन २००६-२००७ साली जिल्हयात उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कायमस्वरुपी ढाल प्रधान करून गौरविण्यात आले होते.
संस्थेने गेली १५ वर्ष शशिकांत उर्फ बबन झिजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विनम्र आणि तत्पर सेवा व पारदर्शक व्यवहार व्यवस्थित रित्या चालविला आहे. संस्थेची ३१ मार्च २०२१ ची आर्थिक स्थिती पाहता संस्थेने सभासदांच्या ठेवीवर जास्तीत जास्त ९% व्याज देवून सभासदांना कमीत कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करीत आहे. या पतसंस्थेची १५ वर्षापूर्वी वार्षिक उलाढाल रु.१७ कोटीच्या आसपास होती. आता १५ वर्षात संस्थेची वार्षिक उलाढाल रु.२०० कोटींच्या जवळपास आहे. कर्ज मर्यादा रु. ५० हजाराहून रु. १५ लाखापर्यंत वाढविली आहे. कर्ज थकबाकी ०.००१% इतकी आहे. संस्थेला सतत ‘अ’ वर्ग दर्जा मिळालेला आहे. संस्था स्थापनेपासून सलग ५० वर्ष सभासदांना जास्तीत जास्त १४% लाभांश वाटप करीत आहे. संस्थेच्या सलग २५ वर्ष सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षिस म्हणून रुपये ५०००/- वाटप करीत आहे. तसेच संस्थेच्या मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था आहे. संस्थेची ३१ मार्च २०२१ अखेर आर्थिक स्थिती एकूण भाग भांडवल रु.५२ कोटी, सभासद ठेवी रु.२६ कोटी सभासद कर्ज वाटप रु.१४४ कोटी व बँकेतील गुंतवणूकी रु.२४ कोटी व बँक उचल रक्कम रु.४१ कोटी (देणे) इतकी आहे.
शशिकांत ऊर्फ बबन झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या व सभासदांच्या एकजुटीने संस्थेला प्रगती पथावर ठेवण्याचे काम करीत आहे.
पिंपरी चिंचवड मनपा सेवकांच्या पतसंस्थेला जिल्हयात प्रथम क्रमांकाची मानाची ढाल

8 Comments
Byron Dayrit
What i don’t realize is if truth be told how you are no longer actually a lot more neatly-preferred than you may be right now. You’re so intelligent. You recognize therefore considerably in the case of this topic, made me for my part believe it from so many various angles. Its like women and men aren’t interested except it is something to accomplish with Girl gaga! Your own stuffs outstanding. Always care for it up!
Baseball live streaming
of course like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. Several of them are rife with spelling issues and I find it very troublesome to inform the reality then again I will certainly come back again.
Yung Naddeo
There is visibly a lot to know about this. I believe you made certain nice points in features also.
Live NFL
Wonderful beat ! I would like to apprentice at the same time as you amend your website, how can i subscribe for a blog web site? The account helped me a applicable deal. I were a little bit familiar of this your broadcast provided brilliant transparent idea
Soccer games Reddit stream
Fantastic site. Plenty of useful info here. I am sending it to some friends ans also sharing in delicious. And naturally, thanks for your effort!
1xbet bahis
What i don’t realize is in reality how you are now not really much more smartly-favored than you may be now. You are very intelligent. You already know thus considerably when it comes to this matter, made me in my opinion imagine it from numerous numerous angles. Its like men and women aren’t fascinated except it is something to do with Woman gaga! Your own stuffs outstanding. All the time deal with it up!
Leonard Borders
whoah this blog is magnificent i love reading your posts. Keep up the great work! You know, a lot of people are looking around for this information, you could help them greatly.
Marcie Zechiel
I’m not sure why but this weblog is loading incredibly slow for me. Is anyone else having this issue or is it a issue on my end? I’ll check back later on and see if the problem still exists.