आयटीनगरीतील डी.बी.फँसीलीटीज प्रा.ली. कंपनीचा पुढाकार.
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन :-
पौड : विशेष प्रतिनिधी
मुळशी तालुक्यात कोरोना महामारीचा कहर दिवसोंदिवस वाढतच असून गावनिहाय कोरोना बाधीत रुग्ण संख्येत सुद्धा कमालीची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दैनंदिन वार्तांकन करण्यासाठी सतत घराबाहेर असणाऱ्या मुळशीतील पत्रकार बांधवांना नुकताच कोरोना कवच विमा प्रदान करण्यात आला. या उपक्रमासाठी आयटीनगरीतील डी. बी. फॅसिलिटीज प्रा.लि कंपनीचे संपूर्ण सहकार्य लाभले. पौड येथील तहसील कार्यालयात नुकताच पत्रकारांना ‘कोरोना कवच’ विमा प्रदान सोहळा पार पडला.
कोरोना महामारीच्या कालावधीत अगदी सुरुवाती पासून मुळशी तालुक्यातील सर्वच उपनगर वार्ताहर आपला जीव धोक्यात घालून गावठाण, वाड्यावस्त्यांवर तसेच विविध शासकीय कार्यालयात उपस्थित राहून दैनंदिन घडामोडी तसेच कोरोना विषयीचे अपडेट्स बातमीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. राज्य शासनाकडून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच कार्यरत असणाऱ्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले, त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षण आणि उपचारासाठी काही कोविड रुग्णालयात विशेष तरतूद देखील करण्यात आली. मात्र, दुसरीकडे अशा विदारक परिस्थितीत सुद्धा प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावणारे मुळशी तालुक्यातील पत्रकार मात्र या सगळ्यांपासून दुर्लक्षित राहिले.
अगदी सुरवातीला एप्रिल महिन्यापासून ते अनलॉक कालावधी सुरू होई पर्यंत वेळोवेळी सर्व घडामोडींचे अचूक वार्तांकन करणाऱ्या तालुक्यातील उपनगर पत्रकार बांधवांचा विमा काढण्यासाठी अखेर तालुक्यातील काही पत्रकार बांधवांनी पुढे सरसावत प्रयत्न सुरू केले. त्यास अखेर यश आले असून यासाठी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे जिल्हा अध्यक्ष तसेच आयटीनगरीतील डी.बी.फँसीलीटीज प्रा.लि. कंपनीचे संचालक पै. दिलीप भरणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
पौड येथील तहसील कार्यालयात पत्रकारांना कोरोना कवच विमा प्रमाणापत्र वितरणाचा औपचारिक कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझीरे तसेच राजेंद्र बांदल आणि तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी पत्रकार रोहिदास धुमाळ आणि विजय वरखडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
” पत्रकारांसाठी संरक्षण म्हणून विमा सुरक्षा कवच असायला पाहिजे यासाठी काही पत्रकारांनी सहकार्या बाबत विचारणा केल्यावर, ताबडतोब सर्वोतोपरी मदत करण्यासाठी होकार दिला. कोरोनाच्या विदारक परिस्थितीत देखील आपल्या जीवाची पर्वा न करता दररोज अचूक वार्तांकन करणाऱ्या तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून सहकार्य केले.
दिलीप भरणे : संचालक, डी.बी फँसिलिटीज प्रा.लि. हिंजवडी.”
9 Comments
Kristyn Harradine
A person essentially help to make critically posts I’d state. This is the first time I frequented your website page and thus far? I surprised with the research you made to create this particular submit amazing. Excellent process!
NFL games Reddit stream
Absolutely composed subject material, Really enjoyed studying.
Watch cricket online free
I’m still learning from you, as I’m improving myself. I definitely enjoy reading everything that is posted on your blog.Keep the stories coming. I enjoyed it!
astros reddit stream
It’s hard to find knowledgeable people on this topic, but you sound like you know what you’re talking about! Thanks
NBA live stream today
Real clear internet site, regards for this post.
1xbet giriş
Those are yours alright! . We at least need to get these people stealing images to start blogging! They probably just did a image search and grabbed them. They look good though!
Vivan Skutt
It’s the best time to make some plans for the future and it’s time to be happy. I’ve read this post and if I could I want to suggest you some interesting things or advice. Perhaps you could write next articles referring to this article. I wish to read even more things about it!
Gene Crannell
I got what you mean ,saved to bookmarks, very decent site.
Randal Lewter
Some really interesting information, well written and broadly speaking user pleasant.