नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
वाकड (पुणे ):- पिंपरी चिंचवडमध्ये एक पिकअप चालकाने वाहनांना उडवले आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत ही कैद झालाय. साडे बाराच्या सुमारास हा अपघात ताथवडे-पुनावळे रस्त्यावर झालाय. भरधाव वेगात निघालेल्या पिकअप चालकाने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली, या धडकेत पिकअपचे चाक निखळले. त्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला अन पार्क असलेल्या दुचाकीला ही पिकअपने ठोकरलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मात्र यात एक महिला गंभीर जखमी झालीये. चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असं स्थानिकांचे म्हणणे आहे. वाकड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय.