नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
पुणे (पिंपरी ):- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवशक्ती सोशल फाउंडेशन (संचालित) स्पंदल बाल आश्रम व दयावान सोशल फाउंडेशन यांनी थेरगाव धनगर बाबा मंदिर येथे ध्वजावंदन केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राजेंद्र बहिरट (पोलीस निरीक्षक काळेवाडी पोलीस स्टेशन) राजेंद्र कपोते पोलीस मित्र संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, संतोष बारणे सामाजिक कार्यकर्ते, प्रशांत सपकाळ सामाजिक कार्यकर्ते, शिवराम लटपटे एक मुठी अनाज प्रमुख, स्वप्निल लोहार, सिताराम जगताप, सुरेश इंगळे, स्नेहा कांबळे, लांडगे मावशी उपस्थित होते.

या प्रसंगी स्पंदन बाल आश्रम चे संस्थापक अध्यक्ष मनोज उर्फ गणेश म्हस्के यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात स्पंदन बाल आश्रम चे अनाथ, एक पालतत्व असलेल्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल कलर बॉक्स, पाणी बॉटल व खाऊ वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी दयावान सोशल फाउंडेशन संस्थापक महेश भाऊ गवारे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी दयावान सोशल फाउंडेशन चे पदाधिकारी ललेश गायकवाड, रितेश पवार, रवी मल उपस्थित होते. याप्रसंगी थेरगाव मंदिर येथील परिसरातील रहिवासी उपस्थिती होते.