नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
हिंजवडी (पुणे ):- हिंजवडीत भरधाव वेगात निघालेला रेडिमिक्स डंपर वळणावर आला अन चालकाचा त्यावरील तोल गेला. यामुळं रेडिमिक्स डंपर पलटी झाला, पण दुर्दैवाने त्याचवेळी रेडिमिक्स डंपरखाली दुचाकी दबली अन दुचाकीवरील दोन महिलांचा जागीच जीव गेला. क्रेनच्या साह्यानं रेडिमिक्स डंपर हटविण्यात आला. चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिलांची ओळख पटविण्याचं काम सुरुये. या महिलांचं वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असून त्या नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीये.