चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या शुभेच्छा
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
मुंबई :- भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची चिंचवड मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी मुंबई येथे भेट घेतली. भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचा संपर्क आणि जनतेसोबत असलेली नाळ यामुळे हा महाविजय प्राप्त झाला.याबद्दल त्यांचे अभिनंदन करत आशीर्वाद घेतले.यावेळी शहर भाजपचे पदाधिकारी, मा.नगरसेवक आणि माझे सहकारी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली, आम्ही कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे, लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी योजना, आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टीकोन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला या कामात यश मिळाले असे मत यावेळी शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
यापुढील काळामध्ये देखील आम्ही सर्वजण पक्षाच्या मूल्यांचे पालन करून, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असेल असा आत्मविश्वास या भेटीदरम्यान दिला.