भ्रष्टाचारी गृहमंत्री अमित शहांचा, भ्रष्ट भाजपचा जाहीर निषेध.
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
पुणे :- नुकतेच बालेवाडी येथे पार पडलेल्या भ्रष्टाचारी भाजपच्या अधिवेशनादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत, महाराष्ट्राचे भाग्यविधाते लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांबद्दल अतिशय खोटारडी व खालच्या पातळीवर टीका केली. देशाच्या गृहमंत्री पदावरील व्यक्तीने बाहेरून येऊन इथे आपल्या महाराष्ट्रात पवार साहेबांवर टीका करणे निंदाजनक असून महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या भावनांचा त्यांनी अपमान केला आहे. हा स्वाभिमानी महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही, म्हणूनच आज भ्रष्ट भाजपच्या भ्रष्ट अमित शहाचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पिंपरी येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला तसेच अमित शहा यापुढे कधीही पुणे जिल्ह्यात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा जाहीर निषेध केला जाईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रदेश युवक सचिव प्रशांत सपकाळ, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, कैलास बनसोडे, विशाल जाधव, अल्ताफ शेख, सचिन गायकवाड, विनोद धुमाळ, राहुल आहेर, काशिनाथ जगताप, हेमंत बलकवडे, ज्ञानेश्वर आल्हाट, संजय पडवळ, अनिल भोसले, राजू खंडागळे, सुनील कस्पटे, विशाल काळभोर, शादाब खान, सुनील लांडे, इखलास सय्यद संदीप देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.