सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२५ चे यजमानपद आता भारत भूषवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भातील माहिती ही बर्मिंगहॅम येथे चालू असलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दिली आहे.
आयसीसीने २०२४ ते २०२७ या कालावधीत सर्व प्रमुख स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बर्मिंगहॅम येथे आयसीसीच्या वार्षिक परिषदेत यजमान देशांची नावे निश्चित करण्यात आली. आयसीसी महिला विश्वचषक ही २०२४ पासून सुरू होत आहे. यामध्ये चार वर्षांत होणार्या महिला संघांसाठी चार प्रमुख स्पर्धा होतील, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. याचे यजमानपद बांगलादेशकडे आहे. विशेष म्हणजे ही पहिलीच वेळ आहे की बांगलादेश मोठ्या ICC महिला स्पर्धेचे आयोजन करत आहे आणि दुसऱ्यांदा T२० विश्वचषक आयोजित करत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत १० संघांमध्ये एकूण २३ सामने होतील.
तर महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ ,ही भारत तब्बल पाचव्यांदा ICC महिला स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ICC महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये आठ संघ आणि एकूण ३१ सामने असतील.
काय म्हणाले बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली?
बोर्ड आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चे आयोजन करण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि महिला दिनदर्शिकेवरील या चषकाचे यजमानपद आम्ही जिंकले याचा आम्हाला आनंद आहे.
आयसीसी अध्यक्षपदासाठी निवडणूक नोव्हेंबर २०२२ मध्ये होणार आहे. सध्या हे पद ग्रेग बार्कले यांच्याकडे आहे. त्यांचा कार्यकाळ या वर्षी संपणार आहे. ICC चेअरमनचा कार्यकाळ १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी असेल.