आता राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे,त्यामुळे आपले नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात जास्त वेळा नोंदवल्यास ते शोधून काढणे अधिक सोपे होणार आहे.
सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे, त्यासाठी १ ऑगस्टपासून यासंबंधी मोहिम राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही सदर माहिती दिली आहे
आता मतदार ओळखपत्र जर का आधार कार्डशी लिंक केले गेले तर यामुळे, एकाच व्यक्तीने जर आपले नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात जास्त वेळा नोंदवल्यास ते शोधून काढणे अधिक सोपे होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली या मोहीमेस सुरुवात होणार आहे.आणि यासाठी आता निवडणूक आयोग महाराष्ट्रात यासाठी शिबिरे लावणार आहे, जेणेकरून आधार-मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया सुलभ करता येईल. त्याचबरोबर जर का आपण इच्छित असल्यास आपण ते ऑनलाइन देखील
सादर करता येईल.
त्याचबरोबर आधार कार्डची माहिती आयडेंटिटी कार्डच्या माहितीशी लिंक केल्याने मतदारांची खासगी माहिती वैधानिक प्राधिकरणाला उपलब्ध होईल.
त्यानंतर मतदारांवर मर्यादा येतील. म्हणजेच, मतदारांना आता त्यांचे संबंधित आधार तपशील सादर करून निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसमोर आपली ओळख प्रस्तापित करावी लागेल.
मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्याची ऑनलाइन पद्धत अशी असेल.
तुम्ही नोंदणी केली आहे का नाही जाणून घ्या:
जर तुम्ही NVSP वेबसाइटवर स्वतःची नोंदणी केली नसेल, तर प्रथम तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
खाली दिलेल्या नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायावर क्लिक करा. येथे यूजर्सला त्यांचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल, त्यानंतर तुम्हाला मिळेल.
सत्यापित केल्यानंतर, तुम्हाला नवीन खाते पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. येथे तुम्हाला सर्व तपशील टाकून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला पुन्हा लॉगिन पृष्ठावर नेले जाईल.
NVSP द्वारे करावयाची लिंक:
सर्व वापरकर्त्यांना सर्वप्रथम NVSP (National Voter Service Portal) https://www.nvsp.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
आता तुम्हाला होम पेजवर दिसणार्या मतदारयादीतील सर्च वर क्लिक करावे लागेल. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
येथे तुम्हाला तुमचे मतदार कार्ड, वैयक्तिक तपशील किंवा EPIC क्रमांक आणि राज्य टाकून शोधावे लागेल.
वापरकर्त्यांना येथे फीड आधार क्रमांकाचा पर्याय मिळेल, जो स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिलेला आहे. तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या समोर एक पॉप-अप विंडो उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड तपशील प्रविष्ट करावा लागेल.
यानंतर, वापरकर्त्यांना आवश्यक माहिती भरावी लागेल आणि त्यांची ओळख सत्यापित करावी लागेल. यासाठी तुम्हाला नोंदणीकृत क्रमांक आणि ईमेलवर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल.
शेवटी सबमिट वर क्लिक करायला विसरू नका:
यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल, ज्यामध्ये आधार कार्ड आणि व्होटर आयडी कार्ड लिंक करण्याबाबत माहिती असेल.