देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीपदावर आता द्रौपदी मुर्मू विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे त्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्य आदिवासी महिला ठरल्या आहेत.त्यांच्या या विजयानंतर कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा रेकॉर्डही आता त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे.
सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
राष्ट्रपदीपदाची निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकली असून आता त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत.त्याचबरोबर आता द्रौपदी मुर्मु ह्या भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची जागा घेतील.
त्यांच्या या विजयानंतर त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करत ,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे.त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार इत्यादींनी त्यांना त्यांच्या या विजयासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ आणि निवडणूक:-
द्रौपदी मुर्मु यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड (१६वी राष्ट्रपती निवडणूक)
त्या भारताच्या दुसऱ्या महिला तर आतापर्यंतच्या १ल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या
यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या १ल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्य केले
द्रौपदी मुर्मु भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची जागा घेणार आहेत
रामनाथ कोविंद यांनी २०१७ ते २०२२ दरम्यान १४वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले
भारतीय राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ ०५ वर्ष असतो (पुर्ननियुक्तीस पात्र असतात)
आतापर्यंत फक्त डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीच ०२ वेळा राष्ट्रपती पद भूषविले (१९५०-६२)
राष्ट्रपती निवडणूकीसाठी खासदारांना हिरव्या तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका.