प्रतिनिधी
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळे विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त केल्या असून सगळ्या सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी पत्र दिलं आहे.
लवकरच निवडणुकीपुवीं नवीन नियुक्ती करण्यात येणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काॅग्रेसचे सचिव खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सर्व पदाधिकारी यांना पञ पाठविले आहेत.