काय आहे नवीन डिजिटल मीडियाच्या नोंदणीचा कायदा?
प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा?
सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
खरतर भारतामध्ये अशा प्रकारचा डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठीचा कायदा हा पहिल्यांदाच करण्यात येत आहे. आता हा नवीन कायदा लवकरच आणण्यात येणार आहे. काय आहे हा कायदा जाणून घेऊया:-
आता लवकरच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी नवीन कायदा येणार आहे.माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.आणि विशेष म्हणजे या नव्या विधेयकात डिजीटल न्यूज मीडियाचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता देशात अशा प्रकारचा डिजीटल न्यूज मीडियासाठी हा पहिलाच कायदा असणार आहे.हा कायदा पारित झाल्यानंतर या काद्यांतर्गत ९० दिवसांच्या आत वेबसाईटची नोंदणी करावी लागणार आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे आता वेबसाईट प्रकाशकांना आपल्या वेबसाईटची नोंदणी प्रेस रजिस्टार जनरल यांच्याकडे करावी लागणार आहे.
त्याचबरोबर जर कोण्यात्याही वेबसाईटवर कारवाई करावयाची असेल तर त्याचे अधिकार देखील त्यांच्याकडे असतील. आणि त्यानुसार ते कोणत्याही वेबसाईटची मान्यता रद्द करू शकतात किंवा त्यांना दंड ठोठावू शकतात.
त्यासोबतच या तक्रार निवारणासाठी मंडळदेखील स्थापण करण्यात येईल आणि त्याचे प्रमुख हे प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी असतील.
याआधी अशी काही नियमावली होती का?
खरतर याआधी डिजीटल न्यूज मीडियावर कोणत्याच प्रकारचे कायदेशीर बंधन नव्हते. तसेच २०१९ मध्ये देखील सरकारने या कायद्याचा मसूदा तयार केला होता. परंतु त्यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागले. या टिकेमागचे कारण असे होते कि,अनेकांकडून सरकार हे डिजीटल मीडियावर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत होता.परंतु आता जर का हे सुधारणा विधेयक पारित झाले तर सर्व न्यूज वेबसाईट या कायद्याच्या चौकटीत येतील आणि योग्य त्या नियमावलीची काळजी घेण्यात येईल.