सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
मुळशी (पौड) : ज्या मान्सूनने यावर्षी शेतकऱ्यांना वाट पहायला लावली तोच मान्सून उशिरा का होईना पण जिल्ह्यासह तालुक्यात चांगलाच सक्रिय झाला आणि मागील आठवड्यापासून सूरू झालेल्या या पावसाने मागील दोन दिवस आपले रौद्ररूप धारण करून आपली जोरदार बॅटिंग सुरू केली.आणि काही ठिकाणी नुकसान व शेतकरी व चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.शहर व जिल्ह्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे.त्यातही मागील दोन दिवस खुप अतिमुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.यापैकी सर्वाधिक पाऊस हा पौड,रिहे-आंधळे,कोळवण,माले, ताम्हिणी,आडमाळ-मुठा खोऱ्यात झाला आहे.या परिसरातील शेतकरी मात्र या पावसाने सुखावले आहेत.कारण या भागात भात लागवड केली जाते.व भातलागवडी साठी भरपूर पाऊस आवश्यक असल्याने आता शेतकरी वर्ग मात्र आनंदात आहे.हवामान विभागाने तालुक्यातील घाटमाथा परिसरात व अतिदुर्गम भागात तुफान अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असल्याने पुढील काही तास हे महत्वाचे राहणार आहेत.
पडणाऱ्या या पावसाने गावातील बऱ्याच छोट्या मोठ्या नद्या व ओढ्यांना पूर आले आहेत.यामध्ये जवळ गावातील ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पूर आला असून वर्धाई माता मंदिराच्या ८-१० फूट पाणी आले होते.मुळशी तालुक्यात पावसाळ्यात पर्यटकांची पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने व तालुक्यात कोसळणाऱ्या अतिवृष्टीचा विचार करून मुळशी मध्ये १४४ कलम लागू झाल्याने मुळशीत पर्यटकांनी येवू नये असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
तसेच मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार दि.१४ ते १६ जूलै २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे येत्या दोन दिवस बाहेर पडण्याचे टाळावे असे आवाहनही हवामान विभागाने केले आले आहे.अशा प्रकाऐ मुळशीमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे.नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.