सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
खरतर जिथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची प्रेरणा ही ‘फाइव्ह बिलियन डे’ मधून घेतली गेली आणि ११ जुलै १९८७ रोजी पाच अब्ज दिवस साजरा करण्यात आला. कारण तेव्हा जगाची लोकसंख्या ही तब्बल पाच अब्जांच्या पुढे गेली होती. आणि या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच यावर आपली चिंता व्यक्त केली होती. आणि तेव्हापासूनच खरतर संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यास सुरुवात केली, त्याचबरोबर जगातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आणि कुटुंब नियोजनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता देखील पसरवण्याचे काम करण्यात आले.
आज ११ जुलै रोजी सर्वत्र जागतिक लोकसंख्या दिवस २०२२ साजरा केला जातो.यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जगातील वाढणारी लोकसंख्या आणि या लोकसंख्येबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी खरंतर दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करतात. गेल्या ३२ वर्षापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nation) तत्कालीन गव्हर्निंग कौन्सिलने १९८९ मध्ये त्याची स्थापना केली होती. ११ जुलै १९९० रोजी हा दिवस पहिल्यांदा ९० पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिवस हा जगभरात साजरा करण्यात येतो.
वर्ल्डोमीटरनुसार, या वर्षी जगाची लोकसंख्या सुमारे ८ अब्जांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ती साडेसात अब्जांपेक्षा जास्त होती.खरतर ही वाढणारी लोकसंख्या पाहता हे संपूर्ण जगापूढे एक मोठं आव्हान ठरत आहे. आणि भारताचा विचार करता ही मोठी चिंतेंची बाब आहे.
जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.आणि लोकसंख्या वाढली कि अनेक संकटाना तोंड द्यावे लागते जसे कि बेरोजगारी असेल,वैद्यकीय समस्या असतील,अपुऱ्या घरांची सोय अशा एक ना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.त्यातच भारताची वाढती लोकसंख्या ही भारताच्या मोठ्या समस्यांपैकी एक आहे असे म्हणता येईल, त्यामुळे यावर योग्य ते पाऊल उचलणे काळाची गरज आहे.
विशेष म्हणजे हा दिवस साजरा करताना दरवर्षी या दिवसाची एक विशेष अशी थीम ठरवली, जाते आणि त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो.
या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम ही ‘८ अब्ज लोकांचे जग: सर्वांसाठी एक लवचिक भविष्य, संधी, हक्क आणि निवड सुनिश्चित करणे’ अशी आहे. या थीमवरून हे स्पष्ट होते की जगाची लोकसंख्या ही आठ अब्जांच्या अतिशय चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे, परंतु ती हक्क आणि संधीच्या समानतेपासून दूर आहे.
आजच्या काळात वाढणाऱ्या लोकसंख्येचा परिणाम हा लोकांच्या बेरोजगारी, उपासमार, निरक्षरता अशा अनेक समस्यांचा मोठा प्रश्न बनून पुढे येत आहे.आणि त्यामुळेच जगभरात या दिवशी खरतर कुटुंब नियोजन असेल,वाढणारी गरिबी, स्त्री-पुरुष मधील समानता त्याचबरोबर निरक्षरता, नागरी हक्क, माता आणि बालकांचे आरोग्य, गर्भनिरोधक औषधांचा होणार अतिवापर अशा अनेक पैलूंवर वेगवेगळ्या दृष्टीने विचार केला जातो.त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या वाढत्या लोकसंख्येच परिणाम हा संपूर्ण जगात बघायला मिळत आहेत. तरी लोकसंख्येवर शक्य तेवढे नियंत्रण ठेवण्याचे आव्हान संयुक्त राष्ट्र संघाकडून जगातील विविध देशांना करण्यात आलं आहे. खरंतर भारताने तर वाढती लोकसंख्या हा विषय अति गंभीरतेने घेणे गरजेचं आहे कारण संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या अंदाजानुसार, जुलै २०२२ पर्यंत, जगाची लोकसंख्या ७.९६ अब्जांपेक्षा जास्त होईल. २०३७ मध्ये ती ९ अब्ज आणि २०५७ पर्यंत १० अब्जचा टप्पा ओलांडू शकते. आणि या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे भारत आज अनेक संकटांना सामोरे जात आहे.
लोकसंख्या दिन साजरा करण्याचे हीच मुख्य कारणे पाहता दरवर्षी या दिवशी लोकसंख्या नियंत्रण उपायांवर चर्चा केली जाते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्याला भेडसावणाऱ्या अशा अनेक समस्यांबद्दल जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.