सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन:-
भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती असलेली पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्समध्ये चीनच्या बिंग जिआओचा पहिल्या फेरीत पराभव केला.
सातव्या मानांकित सिंधूने दुसरी फेरी गाठण्यासाठी जवळपास तासभर चाललेल्या लढतीत बिंग जिओचा २१-१३, १७-२१, २१-१५ असा पराभव केला.
गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपनमध्ये सिंधूला चीनच्या जिआओने पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. आणि आता त्याचा बदला सिंधूने मलेशिया मास्टरमध्ये बुधवारी घेताना दिसला आहे.
मात्र आता या विजयासह, जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बिंग जिओविरुद्धच्या पहिल्या फेरीतील पराभवाचा बदला घेतला. आणि चीनच्या खेळाडूचा सिंधूविरुद्ध विजय-पराजयाचा विक्रम अजूनही १०-९ असा आहे.सध्या हेड टू हेडमध्ये जीआओ आघाडीवर आहे.
दुसरीकडे लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायनाला पहिला गेम जिंकूनही दक्षिण कोरियाच्या किम गा युनकडून २१-१६, १७-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.त्यामुळे जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असलेली सायनाही पहिल्या फेरीत पराभूत होऊन गेल्या आठवड्यात मलेशिया ओपन सुपर ७५० स्पर्धेतून बाहेर पडली होती.
तर दुसरीकडे मलेशिया ओपन पुरूष एकेरीमध्ये बी साई प्रणीत आणि परूपल्ली कष्यप यांनी देखील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
अशी होती सिंधूची लढत:-
गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपनमध्ये सिंधूला चीनच्या जिआओने पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. आणि आता त्याचा बदला सिंधूने मलेशिया मास्टरमध्ये बुधवारी घेतला.
सिंधू आणि जिआओ यांच्यात आतापर्यंत १९ लढती झाल्या आहेत. त्यातील चीनच्या जिआओने १० लढती जिंकल्या आहेत तर सिंधूने ९ लढतीत विजय मिळवला आहे.सध्या हेड टू हेडमध्ये जीआओ आघाडीवर आहे.