यंदाच्या मिस इंडिया २०२२ कडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि मिस इंडिया चा हा अप्रतिम ‘किताब कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं तिच्या नावावर केला आहे.
सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन:-
कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया २०२२चा किताब पटकावला आहे. हा सोहळा ३ जुलै रोजी मुंबईत पार पडला होता. यादरम्यान नेहा धुपिया, मलायका अरोरा, दिनो मोरिया तसेच क्रिकेटर मिताली राज, डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना इत्यादी सेलिब्रिटी मुंबईतील या कार्यक्रमासाठी ज्युरी होते.
मिस इंडिया २०२२च्या अंतिम फेरीत जवळजवळ ३१ स्पर्धकांवर मात करत सिनी शेट्टी हिने मिस इंडियाचा मुकूट आपल्या नावावर केला आहे. तर, अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप व उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी आली आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेशन्समध्ये मिस इंडिया २०२२चा अंतिम सोहळा पार पडला.खरतर हि स्पर्धा सौंदर्यासोबत हुशारीची असते आणि या सर्व स्पर्धकांनी आपल्या सौंदर्याने व हुशारीनेच उपस्थित सर्वांची मनं जिंकली.
कोण आहे मिस इंडिया सिनी शेट्टी?
सिनी कर्नाटकमध्ये राहत असली तरी तिचा जन्म मुंबईचा आहे. वयाच्या चौदा वर्षापर्यंत सिनीने अनेक स्टेज शो केले आहेत.
सिनी शेट्टी ही अवघ्या २१ वर्षांची असून तिने अकाउंटिग व फायनान्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
त्याचबरोबर तिने भरतनाट्यम मध्ये ती सराईत आहे.
अनेक मेहनतीनंतर सिनी शेट्टीला ज्यावेळी मिस इंडिया २०२२ चा ताज मिळाला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित दिसत होता.