पुणे (बाणेर )
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे पश्चिम दिवास् व छंद आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांनी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा ५-८ आणि ९-१४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी घेण्यात आली. या स्पर्धेत ५० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता.
लहू बालवडकर यांनी सर्व मुलांना अशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे सांगून त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. अशाच उपक्रमांतून आपल्याला उद्याचे कलाकार सापडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपली पृथ्वी जगण्यायोग्य बनवायची असेल तर आपण सर्वांनी ती वाचवण्याच्या विविध मार्गांबद्दल जागरूक असले पाहिजे. केवळ एका दिवसापुरते मर्यादित राहून चालणार नाही, असे मत पुणे पश्चिम दिवास् च्या अध्यक्षा अस्मिता करंदीकर यांनी व्यक्त केले.
छंद आर्टच्या शुभांगी चपाटे यांनी सांगितले की, अशा स्पर्धांमुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि त्यांचा कलागुणांना प्रोत्साहन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
कलाशिक्षक गणेश कदम, ज्योती जोग, दिव्या सहस्रबुद्धे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नीलजा बडोदेकर योनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील विजेते :
(वयोगट ५-८ वर्षे)
१) नित्सा दारक,
२) मनसा भाल्ला
३) रिओना
(वयोगट ९-१४ वर्षे)
१ )श्रावणी चाकणकर
२) बिद्या तर्फदर
३) औरश