मुळशी प्रतिनिधी
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन :- मुळशी तालुक्यातील शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,१९ शाळेतील शिक्षक/ शिक्षिका या हक्कांची सुट्टीत मध्ये सुद्धा घेतात मुलांची जादाची शाळा कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शिक्षणाचा लाभ घेता आला नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा चांगला होण्यासाठी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी घडण्यासाठी शिक्षक हे हक्काच्या सुट्टीत मध्ये सुद्धा शाळा सुरू ठेवून जे येतील त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सदैव तत्पर राहून शिक्षण देत आहे.
शाळाला मिळालेल्या हक्काच्या सुट्टी मध्ये आपल्या गावाला न जाता ,घरी न थांबता आपल्या प्रपंचात न गुंतता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे आपले कर्तव्य बजावत आहेत. खरे तर ज्ञान दान हे सर्वात मोठे दान मानले जाते आणि आई वडिलांबरोबर शिक्षक हे आपले ज्ञानदानाचे गुरू आहे. स्वामी तिन्ही जगाचा गुरू विना भिकारी असे बोलले जाते पण मुळशी तालुक्यातील शिक्षकांनी हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे की, शिक्षण आणि शिक्षक हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असून प्रथम स्थान हे आपल्या गुरुला दिले जाते.या मध्ये मुळशी तालुक्यातील शिक्षक मागे नाहीत.
मुळशी तालुक्यातील दऱ्या खोऱ्यात शिक्षक जाऊन आपले कर्तव्य बजावत आहेत जे विद्यार्थी विद्यार्थिनी येतील त्यांना शिक्षण देत आहेत या मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा आपला शैक्षणिक दर्जा चांगला होण्यासाठी शाळेत घेण्यात येणारे शिक्षणासाठी साथ देत आहेत. आपल्याला येणाऱ्या अडचणी शिक्षकांना सांगून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. करोना काळात शाळा बंद असल्याने आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून हा एक प्रयत्न करत आहेत.