सन २००३ वर्षातील १० वीचे विध्यार्थी २० वर्षानी एकत्र स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा
वाकड
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन :- पुन्हा मला एकदा शाळेत जायचंय असा अट्टाहास धरत, प्रेरणा शिक्षण संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालयातील सन २००३ च्या इयत्ता १० वी च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा तो वर्ग भरविला. शाळेतील शिस्त, मागच्या बाकावर केलेली मस्ती आणि विद्यार्थ्यांना चूक केल्याबद्दल शिक्षकांनी केलेली शिक्षा अश्या भरगच्च आठवणींची शिदोरी घेऊन तब्बल २० वर्षानी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षकांची अनेक वर्षानंतरची आदरयुक्त भावनिक भेट सर्वांना सुखावून गेली.
प्रेरणा शिक्षण संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय मधील मार्च २००३ मध्ये इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेऊन शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. शाळेची पहिली घंटा, शिक्षकांचे एक साथ नमस्ते करून केलेले अभिवादन, राष्ट्रगीत, प्रार्थना आणि दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. आज प्रत्येक जन वेग वेगळ्या क्षेत्रात काम करत आहे मोठ्या हुद्यावर आहेत. पण शाळेच्या ओढीने सर्वांना आज एकत्र आणले आणि एक उनाड दीवस जगायला भाग पाडले.
शाळेतील शिक्षक वृंद तसेच संस्थापक तुकारामभाऊ गुजर यांचा यावेळी सत्कार करून सन्मान करण्यात आला. तर एवढ्या वर्षांनी सुध्दा आपल्या शाळेतील त्या घंटा देणाऱ्या मामांना सुध्दा मुलं विसरली नव्हती. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलक्षण दुधे, अवंती शितोळे, सुधीर पडवळ यांनी उत्तमरित्या पार पाडले. तसेच फेसबुक व व्हाट्सअपच्या जमान्यात 20 वर्षानंतर सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आणि उत्तम कार्यक्रमाचे नियोजन विनय केदारी, सुलक्षण दुधे, राहुल शिंदे, अंकुश कुदळे आणि गीतांजली आफळे-नवले यांनी नियोजनबद्ध पार पाडले.
शाळा आली म्हणजे मधली सुट्टी ही आलीच. यावेळी सर्वांनी चवीष्ट जेवनाचा पुरेपुर आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या मनोगतसोबतच, शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त करत जुण्या आठवनींना उजाळा दीला व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संदेश कुंभार यांनी केले.
“यावेळी सामाजीक बांधीलकीची जान ठेवत १० विच्या बॅच मधील त्यांचाच सोबती असलेल्या एका कॅन्सर ग्रस्त मित्राला आर्थिक मदत म्हनुण वर्गणी काढुन त्याच्या कुटुंबाला देण्यात आली.