सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
जगामध्ये सतत काहीनाकाही नवीन घडताना आणि बनताना दिसून येते.
तसेच काहीसे सर्वांना आश्चर्यचकित करेल अशी गोष्ट बनली आहे ती म्हणजे ,चीनमधील ग्वांगडोंगमधील ५२६ मीटर ग्लास बॉटम ब्रिजला मागे टाकणारा जगातील सर्वात मोठा काचेचा पूल हा उघडण्यात आला आहे.
हा पूल व्हिएतनाम येथे स्थित आहे आणि यालाच व्हिएतनामचा बाख लाँग पादचारी पूल असेदेखील म्हणतात. हा पूल तब्बल ६२३m (२.०ft) लांब आहे आणि एका विशाल जंगलाच्या वर १५०मीटर (४९२ft) आहे. अहवालानुसार, आशियाई देशाने एका हिरवळीच्या जंगलाच्या वर झुललेला काचेच्या तळाचा पूल उघडला आहे.
बाख लाँग पादचारी पूल ज्याचा व्हिएतनामी भाषेत अर्थ ‘पांढरा ड्रॅगन’ असा होतो. पूल रेनफॉरेस्टच्या वर झुलतो पुल एका वेळी 450 लोकांना आधार देऊ शकतो आणि पुलाचा मजला टेम्पर्ड ग्लासपासून बनविला गेला आहे.